शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे या तारखेला होणार जमा, यादीत आपले नाव चेक करा

Siddharth Tambe

By Siddharth Tambe

Updated on:

Follow Us
Namo Shetkari Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी नमो शेतकरी योजना (Namo Shetkari Yojana) संबंधित नवीन महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. या लेखामध्ये तुम्हाला समजेल की कशामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत कायकारण असेल त्यांचे पैसे का अडकले असतील व या अडचणींचा निवारण कसा होऊ शकतो.

नमो शेतकरी महासन्मान योजना ही पी.एम. किसान योजने सारखीच एक योजना आहे या योजनेद्वारे हजारो शेतकरी लाभ घेत आहेत पण मित्रानो काही शेतकऱ्यांना अजूनही योजनेचा पूर्ण लाभ मिळालेला नाही. काहींना योजनेचा लाभ मंजूर झाला असला तरी त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

कृषी अधीक्षक अजय कुलकर्णी यांच्या मते शेतकऱ्यांच्या बँक खात्यांच्या तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. तहसीलदार कार्यालय व बँक यांच्या मदतीने या प्रक्रियेचा पाठपुरावा केला जात आहे. ज्यांचे बँक खाते बंद झाले आहे किंवा झिरो बॅलन्स खाते आहे त्या शेतकऱ्यांचे खाते लवकरच सुरू करण्यात येईल जेणेकरून ते योजनेचा लाभ घेऊ शकतील.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने (Namo Shetkari Yojana) अंतर्गत पाचवा हप्ता (माहे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४) व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी २२५४.९६ कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता पीएम किसान सन्मान निधीचा १८ वा ५ ऑक्टोबर पर्यंत जमा झाल्यानंतर लागलीच नमो शेतकरी महासन्मान निधीचा पाचवा हफ्ता देखील शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली. त्यास अनुसरुन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणा-या प्रति वर्ष, प्रति शेतकरी रु. ६ हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रु. ६ हजार इतक्या निधीची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यास सुरवात झाली.

नवीन GR पहा

यादीत आपले नाव तपासा

Siddharth Tambe

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.