नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेचे रु. 2000 हे पुढील 2-3 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा हप्ता 7 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान खात्यात जमा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना एकत्रित दुहेरी फायदा मिळणार आहे.
ई-केवायसी करणे आवश्यक
शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा की पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे, त्यांच्याच खात्यात नमो शेतकरी योजनेची रक्कम जमा होईल. आतापर्यंत तीन हप्ते मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात चौथा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी.
नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादी कशी पाहाल?
1) नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादी पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ उघडा.
2) लॉगिन किंवा लाभार्थी स्थिती निवडा
संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर लाभार्थी स्थिती (Beneficiary Status) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3) तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा नोंदणी क्रमांक (Registration Number) भरा. दिलेला कॅप्चा कोड टाकून डेटा मिळवा (Get Data) या पर्यायावर क्लिक करा.
4) यादी तपासा नवीन पृष्ठावर तुमचा हप्ता आणि यादीबाबतची सविस्तर माहिती दिसेल.
यादी PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी दिलेला डाऊनलोड पर्याय वापरा.
5) जर तुमचे नाव लाभार्थी यादीत असेल, पण पैसे जमा झाले नसतील, तर तुमच्या बँकेत तपासणी करा.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
सर्व शेतकऱ्यांनी वेळेवर ई-केवायसी करून घ्यावी, लाभार्थी यादी तपासावी, आणि बँकेत आवश्यक ती पडताळणी करावी. सरकारकडून या योजनांचा लाभ वेळेत मिळवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सरकारच्या योजनेचा लाभ घ्या.