नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी हप्ता ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते, ज्याअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एकूण 2 हजार रुपये हप्ता दिला जातो. या योजनेतून एकूण 4 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत, कारण एकूण दोन हप्ते (प्रत्येक 2 हजार रुपये) दिले जातात.
तुम्हाला हा निधी मिळाला का, हे तपासण्यासाठी, तुमच्याकडे ऑनलाइन तपासणीची सोपी प्रक्रिया उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे निधी मिळालेला नसेल, तर तुम्ही त्याची स्थिती (स्टेटस) ऑनलाइन तपासू शकता. याबद्दल सर्व आवश्यक माहिती या लेखात दिली आहे, म्हणून कृपया संपूर्ण लेख वाचा.
नमो शेतकरी सन्मान निधी हप्ता स्टेटस ऑनलाईन कसा तपासावा.
1) सर्वप्रथम नमो शेतकरी सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
2) वेबसाईटवर गेल्यावर, तुम्हाला उजव्या कोपऱ्यात दोन पर्याय दिसतील: एक लॉगिन आणि दुसरा बेनीफिशियरी स्टेटस. तुम्हाला स्टेटस तपासायचं असल्यामुळे बेनीफिशियरी स्टेटस पर्यायावर क्लिक करा.
3) नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर दोन्हीपैकी एक पर्याय निवडायचा असेल. यापैकी एक नंबर भरून कॅप्चर टाका आणि गेट डेटा बटणावर क्लिक करा.
4) गेट डेटा बटणावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या शेतकऱ्याच्या संपूर्ण स्टेटसची माहिती मिळेल.
5) या पृष्ठावर स्क्रोल केल्यानंतर फंड डिस्ट्रीब्यूशन डिटेल्स असा पर्याय दिसेल. इथे तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता कधी मिळाला, याची माहिती मिळेल.
6) जर तुम्हाला निधी मिळाला नसेल, तर तुम्ही आपल्या तहसील कार्यालयात जाऊन तक्रार करू शकता.
या पद्धतीने तुम्ही नमो शेतकरी सन्मान निधी हप्ता स्टेटस ऑनलाईन चेक करू शकता. तसेच, जर तुम्ही अजून नोंदणी केली नसेल, तर नोंदणी कशी करायची याबद्दलची माहिती तुमच्या नोंदणी प्रक्रियेसाठी दिली जाईल.
तुम्हाला यासारख्या इतर सरकारी योजनांबद्दल माहिती हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊन सर्व नवीन योजना आणि त्याच्या अपडेट माहितीसाठी पहिल्यांदा मिळवा.