महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळची नवीन योजना : १२०० रुपये भरा आणि वर्षभर फिरा

Jyoti Tongalkar

By Jyoti Tongalkar

Updated on:

Follow Us
msrtc new scheme

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC अंतर्गत एसटी बस च्या या अप्रतिम योजनेबद्दल तुम्हाला माहित आहे का ? लालपरी म्हणजे आपली राज्य परिवहन विभागाची एसटी बस ही महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे. आजच्या जगात प्रवासाची अनेक साधने उपलब्ध आहेत तरीपण सर्वसामान्य माणसाची पहिली पसंतीही लालपरी ला असते.

लाल परी ने प्रवास करण्यासाठी स्वस्त आणि मस्त प्रवास हा एसटी बसच्या माध्यमातून करता येतो म्हणून जास्त प्रवासी हे लाल परीला इतकं महत्त्व देतात प्रवाशांची संख्या आणि लाल परीचे महत्त्व बघता एसटी महामंडळ (MSRTC ) प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी नवीन योजनांची घोषणा करत असते.

या योजनेचे नाव आहे कुठेही मनसोक्त प्रवास योजना प्रवाशांसोबत मैत्रीपूर्ण जिव्हळ्याचे नाते निर्माण व्हावी हे प्रवाशांना कमी खर्चामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जसे की पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळ फिरता यावे, यासाठी महामंडळाने प्रवाशांसाठी कुठेही मनसोक्त प्रवास योजना ही योजना सुरू करण्यात आली होती.

MSRTC Holidays Pass ची “कुठे ही मनसोक्त प्रवास ही योजना 1988 साला पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आजही उत्तम पद्धतीने चालवत आहे. सध्या या योजनेमध्ये काय सुविधा प्रवाशांना मिळतात, आणि किती रुपयांमध्ये प्रवाशांना या योजनेचा पास काढता येतो, कोणकोणत्या प्रकारच्या ST बस या मध्ये असणार आहेत, याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

या योजनेमध्ये प्रवाशांना सात (7) दिवस किंवा चार (4) दिवस याप्रमाणे दोन वेगवेगळ्या पासेस दिल्या जातात. या पासेसमध्ये दोन प्रकारचे पासेस प्रवाशांना घेता येतात साध्या बस सेवेच्या पास मध्ये प्रवाशांना सर्व प्रकारच्या साध्या बसेस साठी म्हणजेच साधी एसटी बस, जलद एसटी बस, रातराणी शहरी आणि यशवंती बस मध्ये प्रवास करता येतो याशिवाय राज्य आणि आंतरराज्य मार्गावर सुद्धा हा विशिष्ट पास वापरला जाऊ शकतो.

निमआराम बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले नसले तरी शिवशाही बस सेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बस सेवेसोबतच साधी एसटी बस, निमआराम बस, नॉन एसी बस, स्लीपिंग आणि चेअर अशा सर्व प्रकारच्या बसेस मध्ये शिवशाहीचा हि पास प्रवाशांना वापरता येतो विशेष म्हणजे शिवशाहीचा पास सुद्धा राज्यांत तसेच इतर राज्य मार्गावर वापरला जाऊ शकतो. कुठेही मनसोक्त प्रवास या योजनेअंतर्गत चार दिवसाच्या आणि सात दिवसाच्या पास साठी वर्षातून दोन फेऱ्या म्हणजेच दोन वेळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

यामध्ये 15 ऑक्टोबर ते 24 जून हा गर्दीचा काळ असतो तसेच 15 जून ते 14 ऑक्टोबर हा कमी गर्दीचा काळ असतो त्यामुळे दोन्ही हंगामामधील पासच्या किमती मध्ये तुम्हाला फरक दिसू शकतो. असं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चे म्हणणे आहे.

या योजनेमध्ये देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदर प्रवाशांना घेता येतात या पासची व्हॅलिडीटी पहिल्या दिवशीच्या रात्रीचे बारा वाजल्यापासून शेवटच्या दिवशी रात्रीचे बारा वाजेपर्यंत असते आंतरराज्य प्रवास आणि महाराष्ट्र मधला प्रवास याची व्हॅलिडीटी ही सारखीच असते.

ज्या प्रवाशांना या Holidays Pass योजना संदर्भात पास काढायचा आहे अशा व्यक्तींनी आपल्या गावच्या किंवा आपल्या शहराजवळच्या एसटी बस स्थानकामध्ये म्हणजेच बस आगारामध्ये जाऊन या योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसोबत त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील कर्मचारी तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये हा पास बनवून देतात त्यामुळे पास काढायचा असल्यास जवळच्या एसटी स्थानकामध्ये जाऊन संपर्क साधावा.किंवा तुम्ही त्यांच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या अधिकृत वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता.

Jyoti Tongalkar

Jyoti Tongalkar

ज्योती टोंगळकर (Jyoti Tongalkar) हि एक content writer असून यांना मराठी भाषेत पोस्ट लिहिण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण एम.कॉम.बी.एड. झाले असून ते सिनियर content writer म्हणून काम करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.