मंडळी महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. ही योजना मागील काही दिवसांपासून चर्चेचा प्रमुख विषय बनली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. मार्च महिन्यापर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधारी पक्षाने लाडकी बहीण योजनेतील रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यासंबंधी कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका करत लाडक्या बहिणींना केवळ 500 रुपयेच दिले जाणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे राज्यातील महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांना नेमकी किती रक्कम मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पात्रता आणि लाभ वितरण
शासनाच्या नियमांनुसार, जे महिला इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही. मात्र, जर त्या योजनेंतर्गत मिळणारी रक्कम 1500 रुपयांपेक्षा कमी असेल, तर उर्वरित रकमेचा फरक लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जातो.
उदाहरणार्थ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरमहा 1000 रुपये मिळणाऱ्या सुमारे 7,74,148 महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपयांचा फरक भरून दिला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी?
मार्च महिन्यापर्यंतचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यांमध्ये जमा झालेला असला तरी, एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. एप्रिल महिना अर्धा उलटूनही हा हप्ता कधी मिळणार, याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयेनिमित्त एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी ठरू शकते.