नमस्कार मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना राबविली जात आहे. या योजनेचा उद्देश शेतीशी संबंधित कामे सोपी व सुलभ करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने उपलब्ध करून देणे आहे.
योजनेचे फायदे
या योजनेत गटांना 9 ते 18 अश्वशक्ती क्षमतेचा मिनी ट्रॅक्टर व त्यासोबत कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर किंवा ट्रेलर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
- एकूण खर्च: ₹3,50,000 पर्यंत
- शासकीय अनुदान: 90%
- स्वयंसहायता गटाचा हिस्सा: 10%
अर्ज कसा करावा?
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी खालील पद्धतीने अर्ज करावा.
1) संकेतस्थळास भेट द्या https://mini.mahasamajkalyan.in
2) ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करून अर्ज भरा.
- बचत गटाचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्याच नावाने नोंदणी करणे आवश्यक आहे.
3) अर्जदाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, ईमेल आयडी, बचत गटाचे नाव, व अर्ज करावयाचा जिल्हा यांसारखी माहिती भरावी.
4) Register बटणावर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
5) ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढा व आवश्यक कागदपत्रे जोडून समाज कल्याण कार्यालयात सादर करा.
शेवटची तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2024 आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी व इतर अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
- पत्ता : नासर्डी पूलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक.