मंडळी राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकरी दूध उत्पादकांना योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने दिल्या जाणाऱ्या अनुदानात 2 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे 7 रुपये अनुदान मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रति लिटर 35 रुपये दर मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
ऑक्टोबरपासून या नागरिकांना मिळेल मोफत गॅस सिलिंडर, पहा कोण आहे लाभार्थी
शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, मंत्री विखे पाटील यांनी दूधाच्या दरात वाढ व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापूर्वी त्यांनी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता.पण मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारातील दुधाच्या भुकटी आणि बटरचे दर स्थिर नसल्यामुळे राज्यात दुधाला योग्य दर मिळणे कठीण झाले आहे.
याशिवाय शासनाची अनुदान योजना 30 सप्टेंबरपर्यंत चालू होती, त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले असते. या पार्श्वभूमीवर, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे अनुदान योजनेला मुदतवाढ आणि वाढीव अनुदानाची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने मंत्री विखे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानात वाढ आणि मुदतवाढीचा प्रस्ताव मांडला, ज्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
या योजनेत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शासनाकडून मिळेल ९०% अनुदान, असा करा अर्ज
महायुती सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतल्यामुळे मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. वाढीव अनुदान योजनेचे पैसे 1 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग केले जातील. यानुसार, 1 ऑक्टोबर 2024 पासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना 28 रुपये प्रति लिटर दर देणे बंधनकारक असेल, आणि उर्वरित 7 रुपये शासनाच्या अनुदान योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातील. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.