मित्रानो राज्यातील विविध ठिकाणी सध्या परतीच्या पावसाची लाट सुरू आहे, तर काही ठिकाणी कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे. मुंबईसारख्या शहरात तापमान वाढले असून, गेल्या दोन-तीन दिवसांत चांगली उकळा अनुभवली गेली आहे.
तथापि, सध्या मुंबईत ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे, कारण येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे, ज्यामुळे गरमीपासून सुटका झाली आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे आणि पालघर येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ऑक्टोबर महिन्यात मुंबई, कोकण आणि गोव्याच्या किनाऱ्यावर मुसळधार पावसाची वेळ येते. यावर्षी ऑक्टोबरमध्ये गोव्यात 110% जास्त पाऊस झाला आहे, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातही अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मुंबई, उपनगर, ठाणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे.
सध्याच्या परतीच्या पावसामुळे अनेक पिकांना फायदा झाला आहे, तरीही खरीप हंगामातील काही पिकांना या पावसामुळे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने नंदुरबार, धुळे, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विशेषता मुंबईमध्ये शनिवार आणि रविवारी मुसळधार पाऊस येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे मुंबईसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यांसारख्या जिल्ह्यांनाही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक घाट परिसर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये देखील मुसळधार पावसाची वर्तमनात माहिती दिली गेली आहे.