भारत सरकारच्या वतीने 1 जानेवारी 2017 पासून मातृ वंदना योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना अन्नसुरक्षा कायदा तसेच 2013 कलम चार च्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये गरोदर महिलांना सहा हजार रुपयांचा लाभ प्राप्त होतो.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना फक्त गरोदर महिलांसाठी राबविण्यात येते आणि या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी 5000 रुपये तर दुसऱ्या अपत्यासाठी 6000 रुपयांचा निधी देण्यात येतो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमध्ये गरोदर माता, नवजाक बालक यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत एकूण तीन टप्प्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात त्यामध्ये नोंदणी केल्यानंतर 1000 रुपये, गर्भ धारणेला सहा महिने झाले की दोन हजार रुपये आणि त्यानंतर बाळाच्या पहिल्या लसीकरण नंतर दोन हजार रुपयांचा निधी वाटप केला जातो.
या योजनेमध्ये ज्या महिलांना 40 टक्के पर्यंत अपंगत्व आलेले आहे अशा महिला पण लाभ घेऊ शकतील. ज्या महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे तसेच ज्या महिलेकडे श्रम कार्ड आहे अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेसाठी कमीत कमी वय 19 वर्षांच्या वरती असावे. एससी तसेच एसटी प्रवर्गातील महिला या योजनेसाठी पात्र असतील.
ज्या महिला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी पात्र असतील अशा महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगणवाडी केंद्र येथे नोंदणी करायची आहे. सदर महिलेला योग्य माहितीसह आणि दस्तावेजासह फॉर्म भरून द्यावा लागू शकतो. महिलेकडे स्वतःचे आधार कार्ड असावे आणि हे आधार कार्ड बँकेला लिंक केलेले असावे.