Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हि महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत लाडक्या बहिणीला मासिक १५०० रुपये मिळणार आहे. म्हणजे वार्षिक १८००० रुपये होतात. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरण करणे सुरु सुद्धा झालेले आहे.
E-Pik Vima Grant : खुशखबर ! या शेतकऱ्यांना मिळणार ई-पीक विम्याचे अनुदान , पहा जिल्हानिहाय यादी
काही महिलांचे अर्ज तपासणी सुरु आहे, तर काही महिलांच्या खात्यात रु.३००० जमा पण झालेले आहे. सप्टेंबर महिन्यात ३ महिन्यांचे रु. ४५०० महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तिसरा हप्ता ३० सप्टेंबर पर्यंत जमा करण्यात येणार आहे, असे घोषित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख महिलांना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटी द्वारे थेट खात्यात जमा करण्यात आले आहे.
lek Ladki Yojana : या योजनेअंतर्गत सरकार देणार प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये, असा करा अर्ज
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नी दिले.
अर्ज कसा करावा?
लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविका कडे जावे लागेल, आणि त्यांच्या कडून अर्ज भरून घ्यावा लागेल.