नमस्कार मित्रांनो महायुती सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे, ज्याचा लाभ मोठ्या प्रमाणात लोकांना मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. ही योजना सुरू होताच अल्पावधीतच लोकप्रिय झाली असून, अनेकांनी याचे स्वागत केले आहे.
विरोधकांचा आरोप आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत मतांचे राजकारण साधण्यासाठी ही योजना आणली गेली आहे. लोकसभा निवडणुकीत अपयश आले असल्यामुळे सरकारने ही योजना सुरू केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. परंतु महायुती सरकारने हे आरोप फेटाळले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात चालवली जाईल, हे विरोधकांच्या अपेक्षेबाहेर होते. महिलांना आचारसंहितेत अडकू नये म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच देण्यात आले आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, त्यामुळे महिलांना डिसेंबरचे पैसे देखील नोव्हेंबरमध्ये देण्यात येणार आहेत.
आजपर्यंत या योजनेचे पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. यामुळे एकूण 7500 महिलांना लाभ मिळालेला आहे. पण आचारसंहितेमुळे पुढे काय होईल आणि सरकार परत निवडून आल्यास योजना सुरू राहील का, असे प्रश्न महिलांच्या मनात आहेत. योजनेचे भवितव्य निवडणुकीच्या निकालावर अवलंबून राहील.