नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या योजनेत अर्ज करण्याची मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, जेणेकरून अधिकाधिक महिलांना याचा लाभ घेता येईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया आता अधिक स्पष्ट करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी आपले अर्ज अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. यापुढे अन्य कोणालाही अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे. तसेच, अर्ज मंजूर झाल्यानंतर 4500 रुपये नेमके कधी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील, याबद्दल देखील महत्त्वपूर्ण अपडेट आले आहे.
लाडकी बहीण योजनेचे ४५०० रुपये या महिलांना मिळणार नाही, यादी झाली जाहीर
आता ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे, त्यांच्या खात्यात सप्टेंबरमध्ये तीन महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहेत. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, जुलै महिन्याचा लाभ न मिळालेल्या महिलांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे. येत्या 29 सप्टेंबर ला या योजनेचा तिसरा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल. ज्यांना यापूर्वीचे दोन हप्ते मिळालेले नाहीत, त्यांनाही एकाच वेळी 4500 रुपये मिळणार आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
पॅनकार्ड धारकांसाठी नवीन नियम : हे काम केले असेल तर तुम्हाला दंड बसणार नाही
२ कोटी महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे.