मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या माझी कन्या भाग्यश्री योजना विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना विशेषतः गरीब कुटुंबांमधील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक दर्जात सुधारणा घडवण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. सध्या या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे आणि अनेक कुटुंबे याचा लाभ घेत आहेत.
योजनेचा उद्देश आणि लाभ
माझी कन्या भाग्यश्री योजना ही दोन मुली असणाऱ्या गरीब कुटुंबांसाठी लाभदायक आहे. या योजनेच्या अंतर्गत, मुलीच्या जन्मानंतर जर पालकांनी एका वर्षाच्या आत नसबंदी केली तर सरकारकडून मुलीच्या नावे 50,000 रुपये जमा केले जातात. जर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर नसबंदी केलेली नसली, तर दोन्ही मुलींच्या नावाने 25,000 रुपये प्रत्येकी जमा केले जातात.
या योजनेचे लाभ
- एक मुलगी असल्यास : 18 वर्षांच्या कालावधीत 50,000 रुपये.
- दोन मुली असल्यास : प्रत्येकी मुलीच्या नावे 25,000 रुपये.
- हा लाभ वार्षिक उत्पन्न 7.5 लाखांपर्यंतच्या कुटुंबांना मिळू शकतो, फक्त नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
1) अर्जदाराचे आधार कार्ड.
2) उत्पन्न प्रमाणपत्र.
3) पत्त्याचा पुरावा.
4) महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र.
5) पासपोर्ट साइज फोटो.
6) मुलगी किंवा आईचे बँक पासबुक.
अर्ज कसा करावा
अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करून भरावा व जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात सादर करावा.
अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://womenchild.maharashtra.gov.in
योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या मुलींचे भवितव्य सुरक्षित करा.