नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण महिला किसान योजना या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेचे उद्दिष्ट, पात्रता, स्वरूप, अटी, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
महिला किसान योजना ही अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील महिलांसाठी राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे.
- महिलांचे जीवनमान उंचावणे.
- महिलांना सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळवून देणे.
योजनेची पात्रता
- केवळ अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
- अर्जदार महिलेकडे स्वतःच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे.
- पतीच्या किंवा दोघांच्या नावावर शेती असल्यासदेखील या योजनेचा लाभ मिळू शकतो, परंतु पतीचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
- वय: १८ ते ५० वर्षे.
- ग्रामीण भागासाठी वार्षिक उत्पन्न ₹९८,००० आणि शहरी भागासाठी ₹१,२०,००० पर्यंत मर्यादित असावे.
- अर्जदाराने यापूर्वी मंडळाच्या इतर योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
महिला किसान योजना – स्वरूप
- महिलांना ₹५०,००० आर्थिक सहाय्य दिले जाते.
- ₹१०,००० अनुदान (मुफ्त).
- ₹४०,००० कर्ज, ज्यावर ५% व्याजदर आकारला जातो.
- हे कर्ज केवळ शेती व्यवसायासाठी वापरले जाऊ शकते.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
1) अर्जदाराचा रहिवासी दाखला.
2) उत्पन्नाचा दाखला.
3) ७/१२ उतारा (शेतजमिनीचा पुरावा).
4) जातीचा दाखला (तहसीलदार किंवा समकक्ष अधिकाऱ्याद्वारे प्रमाणित).
अर्ज प्रक्रिया
- महिला किसान योजनेसाठी अर्ज आपल्या जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कार्यालयात सादर करावा.
- अर्ज विहित नमुन्यात भरावा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून कार्यालयात सादर करावा.
- अर्ज विनामूल्य उपलब्ध होतो.
अधिक माहितीसाठी आणि योजनेबाबत नवीन अपडेट जानुण घेण्यासाठी, खालील अधिकृत वेबसाईटला भेट द्या
महिला किसान योजना अधिकृत वेबसाइट
https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/employment.