नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी तर काही ठिकाणी जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
पिक विमा आणि 25% अग्रीम विमा मंजुरी
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांसाठी 25% अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने विविध गावांमध्ये पाहणी करून, 50% पेक्षा अधिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आणले आहे.
समितीच्या अहवालानुसार, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी 25% अग्रीम पिक विम्यासाठी अधिसूचना काढली आहे. जिल्ह्यात तुर, कापूस, बाजरी, मुग, उडीद आणि सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषता सोयाबीन पिकांसाठी विमा मंजुरीचे आदेश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांसाठी मदतीचे प्रमाण
मित्रानो सोयाबीन पिकांसाठी विमा मंजुरीनुसार जवळपास 3 लाखांपेक्षा अधिक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील. या शेतकऱ्यांना एकूण 150 कोटी रुपयांपर्यंत पिक विमा वाटप होण्याची शक्यता आहे.
राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून इतर जिल्ह्यांची माहिती लवकरच मिळेल. शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ होईल.