नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महामेष योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेद्वारे सरकारकडून मोठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. योजना खालीलप्रमाणे लाभ देईल
1) शेळी-मेंढी पालनासाठी आर्थिक मदत
महिन्याला ₹6,000 रुपये चराईसाठी अनुदान
1 गुंठा जमीन खरेदीसाठी आर्थिक मदत
जोडधंदा म्हणून कुकुटपालनासाठी 75% अनुदान
2) अर्ज प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया पूर्णता ऑनलाइन आहे. फॉर्म भरायला वेळ कमी असल्यामुळे अर्ज तात्काळ दाखल करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2024 आहे.
महामेष योजनेसाठी पात्रता निकष
अर्जदार हा धनगर समाजातील मागासवर्गीय असावा.
अर्जदाराच्या नावे कोणतीही शेतजमीन नसावी.
कुटुंबात किमान 20 मेंढ्या आणि 1 मेंढानर असावेत.
अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्जदाराचे बँक खाते आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत नसावा.
अर्जदाराने यापूर्वी महामेष योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
महामेष योजनेचे फायदे
शेळी-मेंढी पालनासाठी 1 गुंठा जमिनीची खरेदी.
महिन्याला ₹6,000 अनुदान (जून ते सप्टेंबर) चराईसाठी मिळेल.
कुकुटपालनासाठी 75% अनुदान.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
1) Mahamesh.org या संकेतस्थळावर भेट द्या.
2) नोंदणीसाठी आवश्यक माहिती भरा आणि आयडी-पासवर्ड तयार करा.
3) लॉगिन केल्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
4) सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करा आणि अर्ज सबमिट करा.
एकदा अर्ज मंजूर झाला की, तुम्हाला योजनेचे सर्व लाभ मिळतील.