मंडळी महाराष्ट्रातील महिलांना आता एक नवीन आशेचा किरण दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख राजकीय आघाडी यांच्याकडून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वाच्या योजनांची घोषणा केली जात आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक परिस्थितीला एक नवी दिशा मिळणार आहे , त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येण्याची यातून अपेक्षा आहे.
महालक्ष्मी योजना ठरणार राज्यातील महिलांसाठी वरदान ?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने नुकतीच जाहीर केलेली महालक्ष्मी योजना ही राज्यातील महिलांसाठी एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे. या योजने मार्फत प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यामध्ये दरमहा तीन हजार रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे.
ही रक्कम महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि छोट्या व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. महाविकास आघाडीने दिलेल्या आश्वासनानुसार, सरकार स्थापन झाल्यापासून शंभर दिवसांच्या आतमध्ये ही योजना सुरू केली जाईल.
राज्यात येत्या काळामध्ये 288 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांकडून महिलांना विविध प्रकारची आश्वासने देण्यात येत आहेत.या आश्वासनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी नागरिकांचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थी यांना आर्थिक पाठबळ मिळणार असून, त्यांच्या सर्वांगीण विकासाला यातून चालना मिळणार आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी आणि त्याचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचावा, यासाठी राज्य सरकार, प्रशासन आणि नागरिकांनी जागृत राहणे गरजेचे आहे.