मंडळी तुमच्या विहिरीला किंवा बोअरवेलला पाणी कमी असल्यास, शेततळे खोदून त्यात पाण्याचा साठा करून शेतीला पाणी पुरवठा करता येतो. या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली आहे.
पूर्वी या योजनेत ५०,००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जात होते. सध्या अनुदानाची रक्कम वाढवून ७५,००० रुपये करण्यात आली आहे. हे अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट वर्ग केले जाते.
योजनेसाठी पात्रता
1) अर्ज करणारा शेतकरी महाराष्ट्र राज्यातील असावा.
2) किमान ६० गुंठे (१ एकर) स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
3) शेतकऱ्यांनी महाडीबीटी (mahadbt) पोर्टलवर नोंदणी केलेली असावी.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
1) जमिनीचा सातबारा उतारा (7/12)
2) जमिनीचा ८ अ उतारा
3) आधार कार्ड
4) बँक खात्याचा तपशील.
महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
1) महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करा
- https://mahadbtmahait.gov.in वर जा.
- नोंदणी करा (Register) या पर्यायावर क्लिक करा.
- आवश्यक तपशील भरा आणि युजर आयडी व पासवर्ड तयार करा.
2) लॉगीन प्रक्रिया
- दोन पर्यायांतून लॉगीन करू शकता:
- युजर आयडी आणि पासवर्ड वापरून
- आधार क्रमांक वापरून (OTPच्या सहाय्याने). 3) ऑनलाईन अर्ज कसा करावा?
1) महाडीबीटी पोर्टलवर लॉगीन करा.
2)अर्ज करा.(Apply) हा पर्याय निवडा.
3) सिंचन साधने व सुविधा निवडा.
4) वैयक्तिक शेततळे (With Inlet/Outlet किंवा Without Inlet/Outlet) निवडा.
5) शेततळ्याचा आवश्यक आकार निवडा.
6) जतन करा (Save) वर क्लिक करून अर्ज सबमिट करा.
अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला ₹२३ शुल्क भरावे लागते. पेमेंट प्रक्रिया पोर्टलवरच दिलेली आहे.
महत्त्वाचे फायदे
- योजनेतून मिळणारे अनुदान थेट बँक खात्यात वर्ग होते.
- सिंचनासाठी आवश्यक जलसाठा करून शेती उत्पादन वाढविण्यास मदत मिळते.
- अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि ऑनलाइन आहे.
जर वरील प्रक्रिया कठीण वाटत असेल, तर शेततळे योजनेसाठी अर्ज कसा करावा याबाबत व्हिडिओ मार्गदर्शन मिळवा.