LPG Cylinder हवाई इंधनाच्या दरात शुक्रवारी ३.३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्याच बरोबर हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजीच्या दरात १९ किलोच्या सिलिंडरमागे ६२ रुपयांनी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील – तेल किमतीचा कल लक्षात घेऊन मासिक आढाव्यानुसार ही दरवाढ करण्यात आली आहे.
तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत ६२ रुपयांनी वाढ केल्यामुळे १९ किलोच्या सिलिंडरची किंमत आता १,८०२ रुपयांपर्यंत वाढली आहे. व्यावसायिक एलपीजीच्या दरात ही सलग चौथी मासिक वाढ आहे. १ ऑक्टोबर रोजी व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत ४८.५ – रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याआधी १ ऑगस्टला ६.५ रुपये प्रति सिलिंडर आणि १ सप्टेंबरला ३९ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
वाढीच्या चार फेऱ्यांमध्ये चार मासिक किमती कपात केल्या जातात. चार किमती कपातीत एलपीजीचा दर १४८ रुपये प्रति १९ किलो सिलिंडरने कमी केले होते आणि आता वाढीच्या चार फेऱ्यांमध्ये, दर १५६ रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत. घरगुती वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या स्वयंपाकाच्या सिलिंडरचा दर मात्र ८०३ रुपये कायम आहे.
१४.२ किलोच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याशिवाय विमान टर्बाईन इंधनाच्या (एटीएफ) दरातही शुक्रवारी ३.३ टक्के वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर दिल्लीत एटीएफची किंमत २,९४१.५ रुपये प्रति किलोने वाढून ९०,५३८.७२ रुपये किलो झाली आहे.