lek Ladki Yojana : महाराष्ट्र मित्रांनो राज्य सरकारने महिलांच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे लेक लाडकी योजना. या योजनेद्वारे राज्यातील मुलींसाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते, ज्यामुळे त्यांना शालेय व उच्च शिक्षणाच्या खर्चात मदत मिळते.
योजनेचा उद्देश आणि लाभ
लेक लाडकी योजना अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 18 वर्षांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. याप्रमाणे एकूण 1 लाख 1 हजार रुपये टप्प्याटप्प्याने दिले जातात
Gas Cylinder Rate : गॅस सिलिंडरच्या दरात मोठे बदल, आज पासून नवीन दर लागू होणार
जन्मानंतर – 5,000 रुपये
प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यावर – 6,000 रुपये
सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्यावर – 7,000 रुपये
अकराव्या वर्गात प्रवेश घेतल्यावर – 8,000 रुपये
वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर – 75,000 रुपये
आवश्यक अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटींची पूर्तता आवश्यक आहे
या योजनेअंतर्गत सर्वांना मिळेल रु.2 लाख पर्यंत लाभ , जाणून घ्या हि योजना
1) 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळेल.
2) पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबांसाठी ही योजना लागू आहे.
3) कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असावे आणि त्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
4) लाभार्थी कुटुंबाचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
5) पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
असा करा अर्ज
या योजनेद्वारे मुलींच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक मदतीची व्यवस्था केली गेली आहे, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील प्रगतीसाठी एक आधार निर्माण होईल.