नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांतील मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजना मंजूर केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत करून त्यांचे भविष्य सुरक्षित करणे. या योजनेंतर्गत मुली १८ वर्षांच्या झाल्यानंतर त्या लखपती बनतील आणि राज्यभरातील लाखो गरीब कुटुंबांतील मुलींना याचा लाभ होईल.
लेक लाडकी योजना काय आहे?
लेक लाडकी योजनेचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत
- मुलींच्या जन्मदरात वाढ करणे
- मुलींच्या शिक्षणाला चालना देणे
- बालविवाह रोखणे आणि मुलींच्या मृत्यू दरात घट करणे
- कुपोषण कमी करणे
- मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांना आर्थिक प्रोत्साहन देणे
योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत
1) पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांमध्ये मुलगी जन्माला आल्यास प्रथम ५,००० रुपये दिले जातील.
2) मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यानंतर ६,००० रुपये, सहावीत गेल्यावर ७,००० रुपये दिले जातील.
3) अकरावीमध्ये गेल्यानंतर ८,००० रुपये आणि मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला ७५,००० रुपये दिले जातील.
या योजनेच्या माध्यमातून मुलींना एकूण १,०१,००० रुपये दिले जातील ज्यामुळे त्या १८ वर्षांच्या होईपर्यंत लखपती बनतील.
लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळेल?
१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एका किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकेल. जर एका मुलासोबत एक मुलगी असेल, तरीही मुलीला याचा लाभ दिला जाईल.
दुसऱ्या प्रसूतीवेळी जुळ्या मुली जन्माला आल्यास एक किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो, परंतु आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल.
लेक लाडकी योजना हे महाराष्ट्र राज्य सरकारचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे जे मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग दाखवते. आर्थिक मदतीच्या रूपाने मुलींच्या शिक्षणाला चालना मिळेल आणि कुटुंबेही यासाठी प्रोत्साहित होतील.