मित्रांनो आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांसंदर्भात तसेच शेतकऱ्यांच्या पड जमिनींबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते देण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्याची परवानगी देण्यात आली.
त्याचबरोबर राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना त्यांची ४,८४९ एकर जमीन परत मिळवून देण्याचा निर्णय घेतला गेला. यामुळे शासनाने जमा केलेली जमीन आता शेतकऱ्यांच्या मालकीची होईल. शेतकऱ्यांना रेडीकरनरच्या २५% रक्कम भरणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम-२२० अंतर्गत पड जमिनींबाबत असलेल्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या बैठकीत घेतलेला हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.