नमस्कार मित्रांनो लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana) ही केंद्र सरकारने महिलांच्या सशक्तिकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. चला या योजनेची सविस्तर माहिती, फायदे, आणि अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया.
योजनेचा उद्देश
लखपती दीदी योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आहे. सरकार महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्नशील असून, त्यांच्या उद्योजकीय क्षमतेला प्रोत्साहन देण्यावर भर देत आहे. यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते.
योजनेचे स्वरूप
या योजनेअंतर्गत महिलांना बचत गटांशी जोडले जाते. त्यानंतर त्यांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण दिले जाते, ज्याद्वारे त्या स्वताचा व्यवसाय सुरू करू शकतात. व्यवसायाच्या निधीसाठी महिलांना 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
योजनेचे फायदे
1) महिलांना बचत गटाशी जोडून आर्थिक मदत दिली जाते.
2) व्यवसायासाठी आवश्यक असलेले कौशल्य शिकवले जाते.
3) उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते.
योजनेच्या अटी
अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत नसावा.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
अर्ज कसा करावा?
1) महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाचे नियोजन करावे.
2) उद्योगाचा आराखडा तयार करून तो संबंधित सरकारी कार्यालयात सादर करावा.
3) अर्जाची पडताळणी केल्यानंतर, सर्व अटी पूर्ण झाल्यास महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल.
अधिकृत वेबसाइट
योजनेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – https://lakhpatididi.gov.in/hi/
मित्रानो लखपती दीदी योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या उद्योगाद्वारे प्रगती करता येईल. योग्य नियोजन कौशल्यविकास आणि सरकारकडून मिळणाऱ्या सहाय्याने महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.