मंडळी आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला असेल आणि अजूनपर्यंत तुम्हाला पैसे मिळाले नसतील, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच जारी होणार आहे.
हवामान अंदाज : हे जिल्हे मुसळधार पावसाने झोडपून काढणार
महिला आणि बाल विकास कल्याण विभागाच्या मंत्री, अदिती तटकरे, यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी तिसऱ्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या महिलांना योजनेचे आधीचे दोन हप्ते मिळाले आहेत, त्यांना तिसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात ₹1500 मिळणार आहेत. आणि ज्यांना अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही, अशा महिलांना थेट तीन हप्त्यांच्या एकत्रित रकमेची ₹4500 रक्कम मिळणार आहे.
सोयाबीन कापूस अनुदान वाटप करण्यास सुरुवात , गावानुसार लाभार्थी यादी जाहीर
पण मित्रांनो यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) सक्षम असणेही गरजेचे आहे. जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल, तर त्वरित ते लिंक करून घ्या. त्यासाठी बँक शाखेशी संपर्क साधा किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नवीन खाते उघडा आणि ते आधारशी लिंक करा. मित्रानो या सोप्या प्रक्रियेमुळे तुम्हाला योजनेचा लाभ सहज मिळू शकेल.