मंडळी आजीत पवार यांनी परळीमध्ये आयोजित प्रचार सभेत महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यामध्ये 3,000 रुपये ऑक्टोबर व नोव्हेंबरसाठी, तसेच दिवाळी बोनस 2,500 रुपये, यामुळे एकूण 5,500 रुपये महिलांना मिळणार आहेत.
ताज्या माहितीनुसार काही महिलांना 7,500 रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. जर कोणत्याही महिलेला या योजनेअंतर्गत लाभ मिळाला नसेल, तर त्यांनी लाडकी बहिण योजना संबंधित वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. येथे त्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का, ते देखील तपासता येईल.
आजीत पवार यांनी स्पष्ट केले की, महिलांना पूर्वीच्या हप्त्यासोबतच आगामी हप्ते देखील मिळणार आहेत. त्यामुळे ज्यांना मागील हप्ता मिळाला नाही, त्यांना पुढील 3,000 रुपये आणि बाकीचे उरलेले पैसे एकत्रित रित्या दिले जाणार आहेत.
तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या महिलांनी योजनेमध्ये अर्ज केलेला असावा आणि तो मंजूर असावा आवश्यक आहे. अर्जदार महिलांनी त्यांच्या बँक खात्याला आधार कार्डाशी जोडणे अनिवार्य आहे; अन्यथा त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर महिलांनी हे लिंकिंग करणे आवश्यक आहे, कारण महाराष्ट्र सरकार फक्त आधार जोडलेल्या खात्यातच पैसे जमा करते.
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजने अंतर्गत तिसरा हप्ता 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान जमा करण्याचा निर्णय घेतला होता, पण काही तांत्रिक कारणांमुळे हे शक्य झाले नाही. नवीन माहितीप्रमाणे, तिसरा हप्ता या आठवड्यात आणि ऑक्टोबरच्या अखेरीस महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
लाभार्थी यादी पाहण्यासाठी, महिलांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात
1) योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा https://ladakibahin.maharashtra.gov.in
2) अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.
3) लॉगिन केल्यानंतर, Applications Made Earlier या पर्यायावर क्लिक करा.
अर्जाच्या स्थितीमध्ये PENDING दिसल्यास, तुमचा अर्ज अद्याप तपासला जात आहे. RE-SUBMIT असल्यास, तुमचा अर्ज त्रुटींमुळे रद्द झाला आहे, आणि तुम्हाला त्या त्रुटी सुधारून पुन्हा अर्ज सादर करावा लागेल.
या प्रक्रिया राबवून महिलांना त्यांच्या अर्जाची स्थिती तपासण्यात आणि योजनेचा लाभ घेण्यात मदत होईल.