यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाकडून अनेक योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि यामध्ये लाडकी बहीण योजना ही मागील काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे कारण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना वर्षाला 18000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.
राज्यात विविध जिल्ह्यातील महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत तसेच ज्या महिलांनी मागील काही दिवसांमध्ये अर्ज दाखल केले त्या महिलांना अद्याप कोणतेही स्टेटस देण्यात आलेले नाही त्यामुळे आपल्या अर्जाचे कोणते स्टेटस आहे आणि आपल्याला पुढील लाभ मिळणार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप चा वापर करू शकता.
सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा आणि तिथे अर्जदार लॉगिन पर्यावर क्लिक करून लॉगिन करा त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज नावाच्या पर्यायावर ते क्लिक करा तिथे तुम्हाला Application Status नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा आणि लाडकी बहीण योजनेचे स्टेटस जाणून घ्या.
पण मित्रांनो यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) सक्षम असणेही गरजेचे आहे. जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल, तर त्वरित ते लिंक करून घ्या. त्यासाठी बँक शाखेशी संपर्क साधा किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नवीन खाते उघडा आणि ते आधारशी लिंक करा. मित्रानो या सोप्या प्रक्रियेमुळे तुम्हाला योजनेचा लाभ सहज मिळू शकेल.
लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत २ कोटी ५२ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. २३ लाख ४० हजार महिलांनी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न न केल्याने त्यांना १५०० रुपयांचा लाभ मिळाला नाही. त्यांच्या घरी जाऊन आधार क्रमांक संलग्न करण्याच्या सूचना महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना दिल्या आहेत.
महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, तसेच सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उपस्थित होते. राज्यात ३० सप्टेंबरअखेर २ कोटी ४१ लाख ३५ हजार ६५७ अर्जांना मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी २३ लाख ४० हजार महिलांनी त्यांचे आधार बँक खात्याशी संलग्न केलेले नाही. त्यांना आधार जोडण्याच्या सूचना देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या घरी पाठवा, अशी तटकरे यांनी योजनेचा आढावा सूचना तटकरे यांनी केली.