मंडळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे आणि पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल रोजी, अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर वितरित केला जाईल. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असं मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
आदिती तटकरे यांच्या महत्वाच्या घोषणाः
आदिती तटकरे यांनी सांगितले की, अलीकडेच सरकारने अर्जांची पडताळणी सुरू केली आहे. त्यामुळे काही महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. तरीही, मार्च महिन्यात लाभ मिळालेल्या सर्व महिलांना एप्रिलचा हप्ता मिळेल, असं त्यांचे आश्वासन आहे. योजनेच्या सुरुवातीपासूनच लाभार्थी महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, ऑक्टोबर 2024 मध्ये जेव्हा लाभ दिला गेला, तेव्हा 2 कोटी 33 लाख महिलांना लाभ मिळाला होता. आता ही संख्या 2 कोटी 47 लाखांवर पोहोचली आहे, असं तटकरे यांनी सांगितले.
योजनेतील लाभ
लाडकी बहीण योजनेतील लाभाचे निकष याआधीप्रमाणेच राहिले आहेत. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांना या योजनेतून लाभ मिळतो. सरकारचा उद्देश महिलांना सरकारी योजनांमधून किमान 1500 रुपयांचा थेट लाभ मिळवून देणे आहे. यामध्ये नमो शेतकरी योजना अंतर्गत 1000 रुपये आणि लाडकी बहीण योजना अंतर्गत 500 रुपये लाभ मिळवले जातात.
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हप्ता
आता 30 एप्रिल रोजी मिळणारा हप्ता लाखो महिलांसाठी गोड आणि खास ठरणार आहे. याव्यतिरिक्त, एप्रिलमध्ये लाभार्थ्यांची संख्यात्मक स्थिती काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशा पद्धतीने, लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी आर्थिक मदत म्हणून महत्वाची ठरली आहे, आणि योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा, ह्या हेतूने सरकार वचनबद्ध आहे.