मंडळी महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब आणि गरजू महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. ही योजना २०२४ मध्ये सुरू करण्यात आली असून आतापर्यंत महिलांना ९ हप्त्यांमध्ये एकूण १३,५०० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
ताजा अपडेट
काही सूत्रांच्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जमा होणार आहे. तसेच, शासनाच्या नव्या निर्णयानुसार, ज्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी १२,००० रुपये मिळतात, त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त ५०० रुपये मिळतील.
लाभार्थींची संख्या
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मते, सध्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या २ कोटी ४७ लाखांवर पोहोचली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये ही संख्या २ कोटी ३३ लाख होती.
सुव्यवस्थेसाठी उपाय
लाडक्या बहिणींना वेळीच पैसे मिळावेत यासाठी बालविकास विभागाने विशेष टीम तयार केली आहे. ही टीम बँक संबंधित अडचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि आधार लिंकिंग इत्यादी समस्यांचे निराकरण करत आहे. पात्र महिलांच्या खात्यात योजनेची मदत वेळेत जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.