लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या वेगवेगळ्या बातम्या बघायला मिळत आहेत, ज्या महिला लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत त्यांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याची देखील सध्या चर्चा आहे. यातच आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.
ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं मागील वर्षी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात.
जुलैपासून ते जानेवारीपर्यंत एकूण सात हप्ते या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत जमा करण्यात आले आहेत.
या योजनेला महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येण्यामध्ये देखील या योजनेचा खूप मोठा वाटा असल्याचं बोलले जात आहे.
आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2100 रुपये जमा करू अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीकडून केली गेली होती.
आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे.त्यामुळे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये कधी जमा होणार ? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. येत्या अर्थसंकल्पानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं मागील वर्षी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे.
मात्र दुसरीकडे जर महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा केले तर त्याचा मोठा आर्थिक ताण हा अर्थव्यवस्थेवर येऊ शकतो असं देखील म्हटले जात आहे, इतर योजनेचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळविण्यात आल्याने इतर योजना ठप्प झाल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे.
त्यामुळे ही योजना ठप्प होणार का ? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे, याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे, मंत्री शंभूराज देसाई यांनी या योजनेबाबत बोलताना मोठा खुलासा केलेला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे काहीही थकीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
लाडक्या बहिणी गोरगरीब कुटुंबातील महिला आहेत, त्यामुळे ही योजना सुरूच राहणार असल्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे.तसेच सरकार मागील वर्षीचा स्पिल ओव्हर या वर्षीच्या आर्थिक वर्षात भरून काढणार आहे, असं देखील शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील लवकरच खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली आहे.