नमस्कार महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणाचा स्तर उंचावण्यासाठी, तसेच कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना लोकसभा निवडणुकीनंतर महिलांना थेट आर्थिक लाभ देण्यासाठी आणण्यात आली होती. २१ वर्षांपासून ६५ वर्षे वयोगटातील सर्व महिलांना काही माफक अटींसह योजनेचा लाभ दिला जात आहे.
योजनेची प्रगती आणि महिलांची अपेक्षा
निवडणूक आचारसंहितेमुळे काही काळ या योजनेला स्थगिती देण्यात आली होती, परंतु निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा सुरू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारला मोठा राजकीय फायदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबर महिन्यातील हप्ता वितरित न झाल्यामुळे राज्यातील महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे, अनेकांच्या मनात शंका होती की, निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल किंवा निकष बदलले जातील. पण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
अजित पवारांचे स्पष्टीकरण
राज्याचे काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेवर भाष्य करत महिलांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, काळजीवाहू सरकारमध्ये निकष बदलले गेलेले नाहीत आणि भविष्यातही तसे होणार नाही.
सामाजिक न्यायासाठीही पुढाकार
पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आंदोलनादरम्यान अजित पवारांनी आंदोलनस्थळाला भेट दिली. लोकशाहीच्या रक्षणाच्या आणि ईव्हीएम गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर चर्चा करताना त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. याच वेळी त्यांनी लाडकी बहीण योजने वरील प्रश्नांना उत्तरे दिली व महिलांच्या हितसंबंधांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.
माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक आधाराचे मोठे साधन आहे. महिलांच्या मनातील संभ्रम दूर करणे आणि आश्वासनांची अंमलबजावणी करणे हे सरकारसाठी महत्त्वाचे आहे. सरकारने ही योजना सुरळीत राबवून महिलांना नियमित आर्थिक लाभ देणे, हीच या योजनेची खरी यशस्वीता ठरणार आहे.