मंडळी विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने लाडकी बहिण योजना जाहीर केली आणि त्यानंतर घाईघाईत अर्ज स्वीकारले. काही अर्जांमध्ये त्रुटी असताना देखील त्याची योग्य पडताळणी न केल्यामुळे अनेक अडचणी आणि गोंधळ निर्माण झाले.
तेल्हारा येथील एक महिलेने लाडकी बहिण योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले आणि त्याचा अर्ज मंजूर झाला. परंतु त्यानंतर त्या पात्र महिलेच्या अनुदानाची रक्कम तेल्हारा तालुक्यातील वडगाव रोठे येथील एका महिलेच्या खात्यात जमा झाली. यामुळे सदर पात्र लाभार्थी महिलेला अनुदान मिळालं नाही आणि तिला योजनेचा लाभ घेता आला नाही. या घटनेबाबत त्या महिलेने जिल्हाधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, तहसीलदार आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कडे तक्रार केली आहे.
योजनेअंतर्गत तेल्हारा शहरातील एक महिलेने रजिस्ट्रेशन केले असतानाही तिच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही, तर वडगाव रोठे येथील महिलेच्या खात्यात जमा झाले. या बाबत तक्रार अर्जासोबत संबंधित पुरावे सादर केले आहेत. अर्जाची योग्य पडताळणी न केल्यामुळे ही चूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पात्र लाभार्थी असलेल्या तेल्हारा येथील या महिलेला अनुदान मिळालं नाही. तिच्या खात्यात एकही हप्ता जमा झाला नाही, त्यामुळे ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिली आहे. तिने या चुकांबाबत शासनाला दुरुस्ती करण्याची मागणी केली असून तक्रारीत तिच्या खात्यात अनुदान न येण्याची कारणे स्पष्ट केली आहेत.
सर्व संबंधित यंत्रणांकडून यावर काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा, अशी त्यांची मुख्य मागणी आहे.