नमस्कार लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे नाव यादीत आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेत गरीब महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची तरतूद आहे.
माझी लाडकी बहिण योजना विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि अविवाहित महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. वयाची मर्यादा 21 ते 65 वर्षांपर्यंत ठेवली आहे. याआधी 1500 रुपये दरमहा मिळत होते, पण आता ते वाढवून 2100 रुपये करण्यात आले आहेत. ही योजना गरजू महिलांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे नाव लाभार्थी यादीत असल्यास त्यांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. तुम्हाला तुमचे नाव यादीत आहे का, हे तपासण्यासाठी testmmmlby.mahaitgov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
वेबसाइटवर गेल्यानंतर लाभार्थी स्थिती हा पर्याय निवडावा. नोंदणी क्रमांक टाकून कॅप्चा भरा आणि Send OTP वर क्लिक करा. नंतर, आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका आणि योजनेसाठी तुमची स्थिती तपासा.
तुमचे नाव यादीत असल्यास, तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचा प्रभाग निवडून PDF डाउनलोड करू शकता. त्या PDF मध्ये तुमचे नाव असल्यास तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात, हे नक्की होईल.
ही प्रक्रिया सोपी आणि घरबसल्या करता येण्यासारखी आहे. त्यामुळे महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे सहजपणे मिळू शकतात.