मंडळी लाडकी बहिण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेत 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, जे योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरतील.
योजनेत करण्यात आलेले बदल
1) इतर योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांसाठी निर्बंध
शासन निर्णयानुसार, ज्या महिला आधीपासूनच इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.
संजय गांधी निराधार योजना लाभार्थी महिलांच्या नावापुढे (YES) हा पर्याय येईल, ज्याचा अर्थ त्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नाहीत, त्यांच्या नावापुढे (NO) हा पर्याय दिसेल.
2) बँक खात्याशी संबंधित अपडेट्स
ज्या महिलांनी संजय गांधी योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना लाडकी बहिण योजनेतील अनुदान बंद केले जाईल. शिवाय योजनेअंतर्गत जमा झालेले पैसे परत वसूल केले जातील.
3) आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता
महिलांना आता त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम, ती कोणत्या बँकेत जमा झाली, आणि जमा होण्याची तारीख याची संपूर्ण माहिती पाहता येणार आहे.
योजनेचा लाभ कसा घ्यावा?
लाडकी बहिण योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज केलेल्या महिलांनाच या बदलांची माहिती मिळेल. योजनेशी संबंधित नोंदणीसाठी नारी शक्ती दूत एप्लिकेशनचा वापर केला जाऊ शकतो, पण सध्या या एपवर नव्या बदलांची माहिती अद्याप उपलब्ध नाही.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी किंवा अर्जासाठी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. यासोबतच अधिक तपशीलासाठी संबंधित YouTube व्हिडिओचा संदर्भ घ्यावा.