नमस्कार डिसेंबर महिन्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मंगळवारपासून वितरित करण्यात येत आहे. योजनेच्या २ कोटी २३ लाख लाभार्थ्यांपैकी पहिल्या दिवशी ६७ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५०० रुपयांची रक्कम जमा झाली. आगामी दोन-तीन दिवसांत उर्वरित महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबर महिन्याचे अनुदान ऑक्टोबरमध्येच देण्यात आले होते.
योजनेची प्रगती आणि पात्र अर्ज
जुलै महिन्यात सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून एकूण २ कोटी ६३ लाख अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. मात्र, १२ लाख ८७ हजार महिलांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न नसल्यामुळे त्यांना निवडणुकीपूर्वी लाभ मिळू शकला नाही. ऑक्टोबर महिन्यात या योजनेअंतर्गत २ कोटी ३४ लाख लाभार्थ्यांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे, एकूण साडेसात हजार रुपये जमा करण्यात आले होते.
डिसेंबर महिन्यासाठी विशेष तरतूद
डिसेंबर महिन्याचा लाभ वितरित करण्यासाठी सरकारने १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महिला व बालविकास खात्याचा कार्यभार मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे कायम राहिल्यामुळे त्यांनी डिसेंबर महिन्याचा लाभ लवकर वितरित करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले.
आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या १२ लाख ८७ हजार महिलांच्या खात्यात सहा महिन्यांचा थकबाकीचा लाभ म्हणून प्रत्येकी ९,००० रुपये जमा करण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी प्रभावी ठरली असून, विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला या योजनेचा मोठा लाभ झाला आहे.
सरकारची महिलांसाठी तळमळ
राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली ही योजना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर महिलांच्या सबलीकरणाचा दृष्टीकोन आहे. सरकारने घेतलेले हे पाऊल महिलांसाठी आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक मान्यता प्रदान करणारे ठरले आहे.