नमस्कार लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना ठरली आहे. सध्या या योजनेअंतर्गत दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ मिळत आहे. या योजनेतून मिळणारे आर्थिक साहाय्य १५०० रुपये वरून २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती माजी मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मार्च २०२५ पर्यंत येणाऱ्या अर्थसंकल्पात हा बदल अंमलात येणार असल्याने लाभार्थींना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ
लाडकी बहीण योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी वरदान ठरली आहे. महिलांना मिळणाऱ्या या आर्थिक सहाय्यामुळे घर खर्च चालवणे सोपे झाले आहे. विशेषता आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना आधार ठरली आहे.
अर्ज तपासणी आणि पात्रता
महिला लाभार्थ्यांच्या अर्जांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. खोटी माहिती भरलेल्या अर्जदारांना योजनेचा लाभ मिळणार नाही. पुणे जिल्ह्यातील काही अर्जदारांचे अर्ज याआधीच बाद करण्यात आले आहेत.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही विशिष्ट निकष ठरवले आहेत. खालील कारणांमुळे महिलांना लाभ मिळत नाही.
1) घरची आर्थिक स्थिती चांगली असल्यास (उदा. चारचाकी वाहन असल्यास)
2) अर्जदार महिला शेतकरी असल्यास ट्रॅक्टर असल्यावरही त्यांना लाभ मिळतो.
3) कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असल्यास.
4) आयकर भरणाऱ्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळत नाही.
बँक खात्यात पैसे आले आहेत का, कसे तपासाल?
ग्रामीण भागातील अनेक महिलांना बँकिंग प्रक्रियेची माहिती नसते. त्यामुळे बँक खात्यात पैसे आले का हे तपासण्यासाठी खालील उपाय करता येतील.
1) बँकेच्या काऊंटरवर जाऊन तुमच्या खात्यातील जमा रक्कमेची माहिती मिळवा.
2) तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून खात्यातील रकमेची माहिती मागवा.
3) जर तुमच्याकडे बँकेचे मोबाइल ॲप असेल, तर स्टेटमेंट डाऊनलोड करून रक्कमेची पडताळणी करू शकता.
4) आधार कार्ड आणि बँक खाते जोडले असल्यास, बँकेकडून जमा रक्कमेचा मेसेज मिळेल.
महिलांसाठी महत्वपूर्ण योजना
लाडकी बहीण योजना ग्रामीण महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचा आधार आहे. योजनेतील आर्थिक साहाय्य वाढवण्याचा निर्णय महिलांसाठी नक्कीच लाभदायक ठरणार आहे. योग्य अर्ज, पात्रता निकष पूर्ण करून या योजनेचा लाभ घेता येईल.