नमस्कार मित्रांनो महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्रित देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण 3000 रुपये जमा होतील, अशी अपेक्षा होती. पण महिला दिनी त्यांच्या खात्यात फक्त 1500 रुपये जमा झाल्याने अनेक महिला नाराज झाल्या आणि विरोधकांनी सरकारवर टीका केली.
सरकारचे स्पष्टीकरण
या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे दोन टप्प्यात वाटप केले जातील.
त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे दोन टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा केले जातील. त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे.
लाभार्थी महिलांसाठी मोठा दिलासा
या निवेदनामुळे लाभार्थी महिलांच्या मनातील संभ्रम दूर झाला आहे. ज्या महिलांना फक्त 1500 रुपये मिळाले आहेत, त्यांना लवकरच उर्वरित हप्ताही मिळेल. त्यामुळे महिलांनी चिंता करण्याची गरज नाही.
सरकारकडून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू असून, सर्व पात्र महिलांना वेळेत आर्थिक मदत मिळेल, असे आश्वासन देण्यात आले आहे.