नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हफ्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक खास योजना आहे. या योजनेमुळे गरजूंना म्हणजेच गरीब महिलांना दर महिन्याला ₹1500 रुपये आर्थिक मदत मिळते. यामुळे महिलांना घरखर्च चालवायला व स्वतःची गरज पूर्ण करायला मदत होते.
एप्रिल महिन्यात महिलांना दहावा हफ्ता मिळाला होता. आता मे महिन्यात अकरावा हफ्ता (11 वा हफ्ता) वाटप केला जाणार आहे. 24 मे ते 30 मे 2025 पासून ह्या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जवळपास राज्यातील दोन करोड 15 लाख महिला लाभार्थी आहे त्यांना आतापर्यंत दहा हफ्त्यांचं वाटप झालेला आहे काही महिलांना अजूनही दहावा हफ्ता मिळाला नाही, आता अकरावा हफ्ता आता कधी मिळणार आणि ज्या महिलांना हप्ते मिळाले नाही त्यांनी काय करायचं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
11वा हफ्ता कसा मिळणार आहे?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 11 वा हप्ता २ टप्प्यांमध्ये दिला जाणार आहे. म्हणजे सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत. काहींना २४ तारखेला मिळतील, तर काहींना नंतरच्या दिवशी 25 तारखेला दिले जाणार आहे.
पण यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागत असतात उदाहरणार्थ महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे. खात्यात DBT (Direct Benefit Transfer) सुरू असणे गरजेचे आहे. म्हणजे सरकार थेट बँकेत पैसे जमा करते.
योजनेचे कोणाला किती पैसे मिळणार ?
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की काही महिलांना फक्त ₹500 मिळतील. कारण त्या महिलांना आधीच नमो शेतकरी योजना मधून ₹1000 मिळाले आहेत. काही महिलांना एप्रिलमध्ये पैसे मिळाले नव्हते, त्यांना मे महिन्यात ₹3000 रुपये मिळणार आहेत.