लाडकी बहीण योजनेचे रु.४५०० या दिवशी जमा होणार, पहा कोणती तारीख आहे

Jyoti Tongalkar

By Jyoti Tongalkar

Updated on:

Follow Us
ladki bahin yojana latest money

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या योजनेत अर्ज करण्याची मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, जेणेकरून अधिकाधिक महिलांना याचा लाभ घेता येईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया आता अधिक स्पष्ट करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी आपले अर्ज अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. यापुढे अन्य कोणालाही अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे. तसेच, अर्ज मंजूर झाल्यानंतर 4500 रुपये नेमके कधी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील, याबद्दल देखील महत्त्वपूर्ण अपडेट आले आहे.

राज्य सरकारची घोषणा : या नागरिकांचे राशनकार्ड होणार रद्द , पहा नवीन निर्णय

लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात करण्यात आली होती, परंतु अनेक महिलांना त्यावेळी कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची मुदत हुकली होती. अशा महिलांना ऑगस्टमध्ये अर्ज करावा लागला, ज्यामुळे त्यांना जुलै, ऑगस्टचे पैसे मिळाले नव्हते.

आता ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे, त्यांच्या खात्यात सप्टेंबरमध्ये तीन महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहेत. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, जुलै महिन्याचा लाभ न मिळालेल्या महिलांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे. येत्या 25 सप्टेंबरपर्यंत या योजनेचा तिसरा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल. ज्यांना यापूर्वीचे दोन हप्ते मिळालेले नाहीत, त्यांनाही एकाच वेळी 4500 रुपये मिळणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

या नागरिकांच्या खात्यात रू. 3000 जमा होणे सुरू, आजच अर्ज करा

सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातही पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे. काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, तर काहींच्या खात्यात अद्याप प्रलंबित आहेत. महिलांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी करावी, कारण कदाचित त्यांच्याकडे पैसे जमा झाले असतील.

मित्रानो ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला आहे, त्यांना फक्त सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ मिळेल. त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीत, हे विशेष लक्षात घ्यावे. तसेच अर्ज भरताना अंगणवाडी सेविका हा पर्याय निवडणे बंधनकारक आहे, कारण इतर पर्याय बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज मंजुरीसाठी अंगणवाडी सेविकांकडे अर्ज सादर करावा लागेल. आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का, हे खात्री करण्यासाठी वेळोवेळी खात्याची तपासणी करावी.

Jyoti Tongalkar

Jyoti Tongalkar

ज्योती टोंगळकर (Jyoti Tongalkar) हि एक content writer असून यांना मराठी भाषेत पोस्ट लिहिण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण एम.कॉम.बी.एड. झाले असून ते सिनियर content writer म्हणून काम करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.