सरकारने शब्द पाळला !! बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
ladki bahin yojana january money deposit

मंडळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपये देण्याची घोषणा महायुतीने केली होती. यावरून सध्या काही वाद-विवाद सुरू आहेत. जानेवारी महिन्यातील हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे पैसे येत्या दोन दिवसांत त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पैसे जमा झाले की नाही, हे तपासण्याची पद्धत खाली दिली आहे.

सरकारने दिला शब्द पाळला

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक अपात्र महिलांनी नोंदणी केली असल्याचे पडताळणीमुळे समोर आले आहे. यावरून, योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या तारखेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्ट केले होते की, जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी खात्यात जमा होईल.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारीच्या अगदी जवळ येत असतानाही हप्ता जमा होत नसल्यानं लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता होती. २४ जानेवारीपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, आणि १५०० रुपये जमा होण्यास प्रारंभ झाला आहे.

खात्यात पैसे आले का? कसं तपासाल?

लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने थेट बँक खात्यात जमा होतात. जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील, तर तुम्हाला मोबाईलवर एक मेसेज प्राप्त होईल. जर मेसेज न आल्यास, तुमच्या बँकेच्या अ‍ॅपमध्ये जाऊन डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करून पैसे जमा झाले की नाही, हे तपासू शकता. बँकेत जाऊन देखील याबाबत माहिती मिळवता येईल.

२१०० रुपये कधी मिळणार?

मंत्री आदिती तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम १५०० रुपये वाढवून २१०० रुपये करण्याबाबत प्रस्ताव पुढे येईल. यावरील शिफारस आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली जाईल. त्यानंतर, योजनेच्या वाढीव खर्चाची तरतूदही या अधिवेशनात केली जाईल. त्यामुळे लाडकी बहिणींना योजनेचा वाढीव हप्ता अधिवेशनानंतर मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.