मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात, आणि योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, जानेवारी 2024 पर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात 10,500 रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ मिळवणाऱ्या महिलांची पडताळणी विविध सरकारी विभागांसोबत केली जात आहे, ज्यात प्राप्तिकर विभाग, परिवहन विभाग, आणि राज्य सरकारच्या इतर विभागांचा समावेश आहे.
तसेच, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काही बातम्या प्रसारित होत आहेत ज्यात 30 लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याचा दावा करण्यात आलेला आहे. या बाबत महिला व बालविकास मंत्री, आदिती तटकरे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, ज्या महिलांच्या खात्यात लाभ जमा झाला आहे, त्यांना तो परत घेतला जाणार नाही. राज्य सरकारने या योजनेतील लाभ परत घेतला नाही, आणि या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
मंत्री आदिती तटकरे यांनी नागरिकांना सूचना दिली की, वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच, महिला व बालविकास विभागाने अद्याप कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या कडूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व लाडकी बहिणींनी अशा फसव्या बातम्यांपासून दूर राहावे.
योजना अंतर्गत जानेवारी 2024 मध्ये दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला. महिलांना योग्य वेळेस लाभ मिळवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.