लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर , जाणून घ्या सविस्तर माहिती

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
ladki bahin yojana good news

मंडळी महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. एप्रिल महिन्याचा अखेर येऊनही अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, आणि यामुळे त्या महिलांना या रकमेची प्रतीक्षा आहे.

पण या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरीस, म्हणजे 30 एप्रिलपर्यंत, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. सध्या अर्जांची तपासणी सुरू असून, योजनेच्या निकषांनुसार अपात्र महिलांना वगळण्यात येत आहे.

योजनेच्या निकषांनुसार, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत 9 लाख अपात्र महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत.

योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी विधानसभा निवडणूक संपल्यानंतर सुरू करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरील महिलांना तसेच सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना वगळले आहे.

संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शकता आणि योग्य अर्जांची निवड सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार आवश्यक तपासणी करत आहे.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.