मंडळी राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी सुरू झाली असून काही शहरांमध्ये अर्ज अपात्र ठरवले जात आहेत. या योजनेत लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. तसेच, अर्जदाराने इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अशी अट घालण्यात आलेली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्जांची छाननी रखडली होती. आता आचारसंहिता संपल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.
अर्ज छाननीतील स्थिती
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. परंतु अर्ज छाननीदरम्यान अनेक अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत. पुणे जिल्ह्यातील स्थिती विचारात घेतली असता, आतापर्यंत 10,000 अर्ज अपात्र ठरले आहेत.
पात्र अर्जांची स्थिती
पुणे जिल्ह्यातून एकूण 21,11,365 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 20,84,000 अर्ज पात्र ठरले आहेत.
अपात्र अर्जांची स्थिती
9814 अर्ज विविध त्रुटींमुळे अपात्र ठरले आहेत.
5814 अर्जांमध्ये किरकोळ चुका असल्याने ते तात्पुरते नाकारण्यात आले आहेत.
आणखी 12,000 अर्जांची छाननी प्रलंबित आहे.
बालकल्याण विभागाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
अपात्र महिलांकडून रक्कम परत घेणार?
योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून अनुदानाची रक्कम परत घेण्यात येत आहे. यापूर्वी लाडकी बहीण योजनेत अनेक घोटाळे झाल्याचे उघड झाले होते. महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या मते, पात्र लाभार्थ्यांवरही आवश्यक ती कारवाई केली जात आहे.