मंडळी राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहन आहे, त्या या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार, 75,100 महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या नावावर वाहन असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या महिलांची योजनेतील पात्रता रद्द होणार आहे.
राज्य शासनाने लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली असून, चारचाकी वाहनधारक महिलांची यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आली आहे. शासनाने ही यादी परिवहन विभागाकडून प्राप्त करून जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केली आहे. त्यानुसार, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची तपासणी करणार आहेत.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक महिलांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याचे आढळले आहे. पहिल्या यादीत 58,350, तर दुसऱ्या यादीत 16,750 महिलांचे नाव समाविष्ट आहे. त्यामुळे एकूण 75,100 महिलांची पात्रता तपासली जाणार आहे.
शासनाने आर्थिक सक्षम लाभार्थ्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडावा, असे आवाहन केले होते. याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने अधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक महिला या योजनेमधून अपात्र ठरणार आहेत.
पडताळणी जलद गतीने पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO), प्रवेशिका आणि अंगणवाडी सेविकांना जबाबदारी दिली आहे. अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांची पूर्व माहिती असल्याने ही प्रक्रिया लवकर पूर्ण होईल आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी शासनाला सादर केली जाईल.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत चारचाकी वाहन असलेल्या महिलांनीही लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने कठोर पडताळणी हाती घेतली आहे.
पडताळणीनंतर अपात्र ठरलेल्या महिलांची अंतिम यादी शासनाला सादर केली जाणार आहे. शासनाच्या नव्या निर्देशानुसार अपात्र लाभार्थ्यांकडून मिळालेली आर्थिक मदत परत घेण्याची शक्यता आहे.
राज्यभर ही प्रक्रिया वेगाने सुरू असून, लवकरच अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.