लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण २९ सप्टेंबर रोजी केले जाईल असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले होते. त्यानुसार काल या योजनेतील पैशांचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
अनेक महिलांच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा झाले आहेत. पैशांच्या वितरणाची प्रक्रिया चालू झाली असून काहीच वेळात सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे.
रविवारी ३४,७४, ११६ लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचे वाटप पूर्ण झाल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. एकूण ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. उर्वरित लाभार्थ्यांना महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकांसाठी येत्य आठ-दहा दिवसांत आचारसंहिता लाग होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत तिसरा व चौथा टप्पा वाटप कध सुरू होणार असा प्रश्न केला जात होता शिवाय, तिसरा आणि चौथा हप्ता एकत्र जमा करण्याची शक्यता वर्तविली जात होती. असे असताना रविवारी तिसऱ्या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली. तटकरे यांनी स्वतः समाज् माध्यमांतून ही माहिती दिली.