नमस्कार पावसाळी अधिवेशनात सुरु झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यावर 1500 रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील महिलांना पाच महिन्यांचे एकूण 7,500 रुपये मिळाले आहेत.
सध्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचे हप्ते विलंबित होण्याची शक्यता आहे का, याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेचे पैसे विधानसभेच्या निवडणुकीनंतरही सुरू राहतील. त्यांनी यावर अधिक स्पष्टता देताना सांगितले की, सहावा हप्ता निवडणूक निकालानंतर लगेचच जमा केला जाईल. नोव्हेंबर महिन्यात 22-23 तारखेला निवडणूक निकाल जाहीर होणार असल्याने डिसेंबर महिन्याचे हप्ते महिलांच्या खात्यात त्या महिन्यात जमा होतील.
मध्य प्रदेशातील लाडली बहना योजना यशस्वी ठरल्याने महाराष्ट्रात तीच योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाने लागू करण्यात आली. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. यामुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून, योजनेबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पात्र महिलांची यादी अद्ययावत करण्याचे काम चालू आहे. महिलांना या योजनेची माहिती त्यांच्या स्थानिक यादीत तपासता येईल.