नमस्कार महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹1500आर्थिक मदत दिली जाते. डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
35 लाख महिलांना लाभ
लाडकी बहीण योजनेतून महाराष्ट्रातील 35 लाख महिलांना लाभ मिळत आहे. योजनेचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वितरित होईल, असे आधी सांगण्यात आले होते. मात्र, योजनेची रक्कम आता आजपासून (सुरुवातीच्या तारखेनुसार) महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
हप्त्याचे वितरण सुरू
महिला व बालविकास खात्याच्या खातेवाटपानंतर ही प्रक्रिया अधिक वेगाने राबवण्यात येत आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी खाते हाती घेतल्यानंतर लगेच हप्त्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. सरकारने योजनेचे वेळापत्रक पाळत महिलांना या आठवड्यात रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते.
₹2100 हप्त्याची घोषणा
महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील रक्कम ₹1500 वरून ₹2100 करण्याची घोषणा केली आहे. नवीन हप्ता केव्हा सुरू होईल, याची अचूक तारीख जाहीर झालेली नाही. मंत्री तटकरे यांनी मार्चनंतर महिलांना वाढीव रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या गरजा भागवण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. यामुळे अनेक महिला त्यांच्या घरगुती खर्चात थोडा दिलासा मिळवू शकतील.