यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाकडून अनेक योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि यामध्ये लाडकी बहीण योजना ही मागील काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे कारण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना वर्षाला 18000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.
आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत तसेच ज्या महिलांना अद्याप लाभ मिळालेला नाही त्यांना तीन महिन्यांचे एकत्रित 4500 देण्यात येतील.
राज्य शासनाकडून या योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील 12 लाख 85 हजार 298 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत त्यामधील 46,162 महिलांचे अर्ज शासनाकडून बाद करण्यात आलेले आहेत म्हणजेच त्या महिलांना लाभ मिळणार नाही.
राज्यात विविध जिल्ह्यातील महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत तसेच ज्या महिलांनी मागील काही दिवसांमध्ये अर्ज दाखल केले त्या महिलांना अद्याप कोणतेही स्टेटस देण्यात आलेले नाही त्यामुळे आपल्या अर्जाचे कोणते स्टेटस आहे आणि आपल्याला पुढील लाभ मिळणार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप चा वापर करू शकता.
सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा आणि तिथे अर्जदार लॉगिन पर्यावर क्लिक करून लॉगिन करा त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज नावाच्या पर्यायावर ते क्लिक करा तिथे तुम्हाला Application Status नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा आणि लाडकी बहीण योजनेचे स्टेटस जाणून घ्या.
पण मित्रांनो यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) सक्षम असणेही गरजेचे आहे. जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल, तर त्वरित ते लिंक करून घ्या. त्यासाठी बँक शाखेशी संपर्क साधा किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नवीन खाते उघडा आणि ते आधारशी लिंक करा. मित्रानो या सोप्या प्रक्रियेमुळे तुम्हाला योजनेचा लाभ सहज मिळू शकेल.