नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वकांशी योजना ठरली आहे. या योजनेमुळे महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे.
या योजनेतुन लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत केली जाते. अनेक लाडक्या बहिणीसाठी ही योजना केवळ आर्थिक मदत देणारी योजना नाही तर त्यांच्या जगण्याचा आधार बनली आहे. यासोबत कुटुंबात महिलांची निर्णायक भूमिका निश्चित करण्यासाठी देखील ही योजना महत्त्वाची ठरली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम जमा केली जात आहे. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 रुपये पेक्षा कमी लाभ घेतअसेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलांना देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा कमी उत्पादन असणाऱ्या महिला पात्र आहेत. ज्या महिलांकडे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल त्या महिलांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास त्या महिला देखील या योजनेसाठी पात्र आहेत.
लाडकी बहीण योजनेमधून आत्तापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एकूण नऊ हप्त्याची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा केली आहे.
जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च असे मिळून एकूण 13500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार ?
लाडकी बहीण योजनेमधून मार्च महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान या योजनेअंतर्गत दहावा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणीच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात नेमकं कधी जमा होणार याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला होता.
7 मार्च पासून हे पैसे देण्यात सुरुवात झाली होती त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ता देखील सात ते आठ एप्रिलला मिळणार का असा प्रश्न महिलांना पडला आहे.