मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र, म्हणजेच ₹3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
हप्त्याला उशीर का झाला?
या योजनेत पात्र महिलांना दरमहा ₹1500 दिले जाते. मात्र एप्रिल महिना संपूनही रक्कम मिळालेली नाही, त्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारकडून अजून अधिकृत घोषणा झाली नसली तरी काही माध्यमांनुसार, मे महिन्यात दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळतील.
मंत्री काय म्हणतात?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे. तांत्रिक कारणांमुळे थोडा उशीर झाला असून, लवकरच रक्कम खात्यात जमा होईल, अशी शक्यता आहे.
लाडकी बहिण योजना काय आहे?
ही योजना जुलै 2024 पासून सुरू झाली. यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे
- एका कुटुंबातील 2 महिलांनाच लाभ
- इतर सरकारी योजना घेतलेल्या महिलांना यातून वगळण्यात आले आहे
२.४७ कोटी महिलांना लाभ
राज्यात सध्या सुमारे 2 कोटी 47 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. आतापर्यंत 9 हप्ते दिले गेले आहेत.
जर तुम्हाला अजूनही हप्ता मिळालेला नसेल, तर थोडं थांबा – सरकारकडून लवकरच चांगली बातमी येण्याची शक्यता आहे.