महाराष्ट्र राज्यातील महिला वर्गाला आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक महत्वाचा प्रकल्प ठरलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण असे पाऊल उचलले आहे. आज आपण या योजने विषयी अधिक माहिती , या योजनेची अंमलबजावणी याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
योजनेचा प्रसार व प्रतिसाद
महाराष्ट्र सरकारच्या या महत्वाच्या योजनेला राज्यभरातून खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. या योजनेसाठी आतापर्यंत 3 कोटींच्या जवळपास ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत , यामधून तालुकास्तरीय समितीने 2 कोटी 34 लाख महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत. ही आकडेवारी आपल्याला दाखवते की राज्यातील महिलांमध्ये या योजनेबद्दल किती जागृती आणि विश्वास निर्माण झाला आहे.
योजनेच्या चांगल्या प्रतिसादामुळे राज्य सरकारने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली होती. या वाढीव कालावधी मध्ये अनेक महिलांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केले होते , त्यांनी केलेल्या अर्जाची मंजुरी प्रक्रिया ही डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. या निर्णयामुळे जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थीं यांना या योजनेचा फायदा मिळण्यास मदत होणार आहे.
योजनेअंतर्गत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु सध्या कोणताही हप्ता ज्यांना मिळालेला नाही, अशा महिलांसाठी एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.
महायुती सरकारच्या स्थापनेनंतर या पात्र महिलां लाभार्थींना एकूण 9600 रुपयांचा लाभ मिळणार आहे.
1) उर्वरित पाच हप्त्यांचे 7500 रुपये
2) डिसेंबर महिन्यातील वाढीव हप्त्याची रक्कम 2100 रुपये
सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने, योजनेचा लाभ वितरण प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली आहे. महायुती सरकारने आश्वासन दिले आहे की, पुन्हा हे सरकार सत्तेत आले तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करून 2100 रुपये प्रति महिना इतका लाभ देण्यात येईल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिला वर्गासाठी एक वरदान ठरलेली आहे. या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे , त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल सुद्धा घडत आहे.